हैदराबादस्थित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील बँकांची ४७३६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने हैदराबादस्थित कोस्टल प्रॉजेक्ट्स लि. ही कंपनी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, असे शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

या कंपनीने २०१३ ते २०१८ या कालावधीत खोटी लेखापुस्तिका आणि आर्थिक विवरणपत्रे तयार केली असल्याचा आरोप एसबीआयने नोंदविलेल्या तक्रारीत केला आहे, असे सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रवर्तकांच्या सहभागाबद्दलही कंपनीने चुकीची माहिती दिली आहे, असेही प्रवक्त्याने सांगितले.

सीबीआयने कंपनीच्या संचालकांच्या हैदराबाद आणि विजयवाडा येथील निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले असून आक्षेपार्ह दस्तऐवज आणि अन्य साहित्य जप्त केले आहे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi books hyderabad based coastal projects ltd in over rs 4736 cr bank fraud zws
First published on: 10-01-2021 at 01:20 IST