नागपूरच्या एका कंपनीच्या विरोधात कोळसा खाण घोटाळा (कोलगेट) प्रकरणात नव्याने एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण २००३ मध्ये एनडीएच्या राजवटीत घडलेले आहे. सीबीआय सूत्रांनी सांगितले की, गुन्हेगारी कट व फसवणुकीचा गुन्हा या प्रकरणी गोंडवाना इस्पात लिमिटेड कंपनीविरुद्ध व त्यांचे प्रवर्तक, संचालक अशोक डागा यांच्याविरुद्ध सत्यापलापाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरा येथील कोळसा खाण वाटपाच्या वेळी नोंदणी करताना कंपनीने खाण मिळवण्यासाठी सरकारला खोटी माहिती दिली होती. कोळसा खाण विकसित न करताच कंपनीने समभाग निकाली काढले व त्यांचा उपयोग हव्या त्या उद्देशासाठी केला नाही. सीबीआयने कोळसा खाणी घोटाळा प्रकरणात २८ वा एफआयआर नोंदवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2014 रोजी प्रकाशित
कोळसा खाण वाटप घोटाळ्यात गुन्हा
नागपूरच्या एका कंपनीच्या विरोधात कोळसा खाण घोटाळा (कोलगेट) प्रकरणात नव्याने एफआयआर (प्राथमिक माहिती अहवाल) दाखल करण्यात आला आहे.
First published on: 09-08-2014 at 05:11 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi registers fresh fir in nagpur based coal scam