भारतीय जनता पक्षाचे(भाजप) दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमागे घातपात नसून तो अपघातच होता, असा निर्वाळा केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) मंगळवारी न्यायालयात दिला आहे.
गोपीनाथ मुंडे यांचा ३ जून रोजी नवी दिल्लीत अपघात झाला होता. त्यानंतर एम्स रुग्णालायत त्यांना मृत घोषित करण्यात आले होते. मुंडे यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता असल्याच्या शंकेने अनेक राजकीय नेत्यांच्या मागणीनंतर मुंडे यांच्या मृत्यूचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीआयकडे सोपवला होता. सर्व प्रकरणाची चौकशी करून सीबीआयने मंगळवारी न्यायालयात मुंडे यांच्या मृत्यूमागे घातपाताचे कोणतेही कारण चौकशीत दिसून आले नसल्याचे म्हटले आणि हा केवळ अपघात असल्याचे सांगितले.