CBSE ने UGC NET 2017 परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारीमध्ये झालेल्या २०१६ च्या यूजीसी द्वितीय (UGC-II) परीक्षा दिलेले विद्यार्थी cbsenet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. उशिराने झालेल्या या परीक्षेचे निकालही उशिराने लागतील असे सांगण्यात येत होते. परंतु, यूजीसीने वेळेत निकाल जाहीर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परीक्षेचे निकाल जाहीर केल्यानंतर जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. सीबीएसईने नुकतेच या परीक्षेची ‘आन्सर की’ प्रसिद्ध केली होती. या परीक्षेतील पहिले सेक्शन हे १०० गुणांचे होते. यामध्ये ६० पैकी ५० प्रश्नांचे १ तास १५ मिनिटांत उत्तर देणे आवश्यक होते. दुसऱ्या सेक्शनमध्ये १०० पैकी ५० प्रश्नांचे उत्तर द्यायचे होते. तिसऱ्या सेक्शनमध्ये १५० गुणांसाठी ७५ प्रश्नांचे उत्तर देणे गरजेचे होते. सीबीएसईने या परीक्षेचे २२ जानेवारी २०१७ रोजी आयोजन केले होते. ही परीक्षा ९० केंद्रांवर घेण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbse ugc net result 2017 january scorecard released www cbsenet nic 2017 net exam
First published on: 29-05-2017 at 18:26 IST