scorecardresearch

सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता

सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
संग्रहित

सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. २ जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. करोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला परवानगी देण्यात आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये कोविशिल्डचं उत्पादन केलं जातं आहे. सीरममध्ये कोविशिल्डचे कोट्यवधी डोस तयार होणार आहे. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्या म्हणण्यानुसार ही लस सरकारला २०० ते २५० रुपयांपर्यंत मिळू शकते. तर खासगी विक्रेत्यांना ही लस ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. या भेटीत त्यांनी कोविशिल्डबाबतची सगळी माहिती घेतली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2021 at 18:00 IST

संबंधित बातम्या