ChatGPT Diet Suggetion: चॅट जीपीटी ने दिलेल्या आहाराच्या सल्ल्याचे पालन केल्याने एका व्यक्तीला जीवघेणा आजार झाला आहे. गिझमोडोच्या अहवालानुसार, डॉक्टरांचे म्हणणे आहे की, एआय-लिंक्ड ब्रोमाइड विषबाधेची ही पहिलीच घटना असू शकते. वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरांनी ‘अ‍ॅनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन: क्लिनिकल केसेस’ मध्ये नोंदवलेल्या या प्रकरणात, या व्यक्तीने तीन महिने सोडियम ब्रोमाइडच सेवन केले, कारण तो त्याच्या आहारात क्लोराइडचा सुरक्षित पर्याय आहे असे मानत होता. हा सल्ला चॅट जीपीटीने दिला असल्याचे सांगितले जाते, मात्र, चॅट जीपीटीकडून या रसायनाच्या धोक्याविषयी कोणताही इशारा देण्यात आला नव्हता, असेही डॉक्टरांनी नमूद केले.

अहवालानुसार, या व्यक्तीने माणसाने चॅट जीपीटीला विचारले की त्याच्या आहारातून सोडियम क्लोराईड (सामान्यतः टेबल सॉल्ट म्हणून ओळखले जाते) कसे काढून टाकायचे. याला चॅट जीपीटीने प्रतिसाद देत, त्याजागी सोडियम ब्रोमाइडने वापरण्याचा सल्ला दिला. एआय चॅटबॉटवरून वाचलेल्या माहितीवरून हा व्यक्ती तीन महिन्यांपासून सोडियम ब्रोमाइड वापरत असल्याचे वृत्त आहे.

ब्रोमाइड संयुगे एकेकाळी चिंता आणि निद्रानाशासाठी औषधांमध्ये वापरली जात होती. यामुळे परंतु गंभीर आरोग्य समस्यांशी होत असल्याने दशकांपूर्वी ते टप्प्याटप्प्याने बंद केले. आज, ब्रोमाइड प्रामुख्याने पशुवैद्यकीय औषधे आणि काही औद्योगिक उत्पादनांमध्ये आढळते आणि ब्रोमाइड विषबाधा, ज्याला ब्रोमिझम देखील म्हणतात ते अत्यंत दुर्मिळ आहेत.

या व्यक्तीला, पूर्वी कोणतीही मानसिक किंवा शारीरिक समस्या नव्हती. त्याला भ्रम, पॅरानोईया आणि सतत तहान लागू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या २४ तासांत, त्याला गोंधळाची लक्षणे दिसली आणि त्याने पाणी पिण्यास नकार दिला, कारण त्याला वाटू लागले की ते असुरक्षित आहे.

यानंतर डॉक्टरांनी त्याला ब्रोमाइड विषाक्तता असल्याचे निदान केले, ही स्थिती आता अत्यंत दुर्मिळ आहे परंतु जेव्हा ब्रोमाइडचा वापर चिंता, निद्रानाश आणि इतर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जात होता तेव्हा ती अधिक सामान्य होती. लक्षणांमध्ये न्यूरोलॉजिकल विकार, मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या आणि चेरी अँजिओमा म्हणून ओळखले जाणारे लाल त्वचेचे डाग यांचा समावेश आहे.

दरम्यान द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन यांचा समावेश असलेल्या तीन आठवड्यांच्या उपचारानंतर, हा व्यक्ती स्थिर झाला असून, त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.