चेन्नई : दुबईला निघालेल्या एका विमानात बॉम्ब असल्याची खोटी तक्रार केल्याबद्दल एका व्यक्तीस शनिवारी अटक करण्यात आली. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य या विमानाने दुबईला जात होते. त्यांना अडवण्यासाठी या व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत या विमानात बॉम्ब असल्याची खोटीच माहिती दूरध्वनीवर दिल्यानंतर हे विमान तपासणीसाठी थांबवण्यात आले होते. या व्यक्तीच्या कुटुंबातील दोन जण या विमानातून दुबईला निघाले होते. त्यांना दुबईला जाण्यापासून रोखण्यासाठी त्याने पोलीस नियंत्रण कक्षाला या विमानात बॉम्ब असल्याचा इशारा देणारा दूरध्वनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर पोलिसांनी व संबंधित सुरक्षा यंत्रणेने दुबईला निघालेले हे इंडिगो कंपनीचे विमान रोखून त्याची संपूर्ण तपासणी केली. हे विमान सकाळी सात वाजून २० मिनिटांनी निघणार होते. या विमानात स्फोटके आहेत का, याची सुरक्षा दलांतर्फे कसून तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही स्फोटके न आढळल्याने सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, या व्यक्तीच्या दूरध्वनीवरून त्या व्यक्तीचा तातडीने शोध लावण्यात आला. तेव्हा हा खुलासा झाला, की त्याला या विमानातून दुबईला निघालेल्या आपल्या दोन कुटुंब सदस्यांना दुबईला जाण्यापासून रोखायचे होते. त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर हे विमान दुबईला रवाना करण्यात आले. तोपर्यंत या विमानातील कर्मचारी व १८० प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai man makes fake bomb threat to stop family from flying zws
First published on: 28-08-2022 at 02:39 IST