निश्चलनीकरणानंतरची सर्वात मोठी बेहिशेबी धनाची जप्ती म्हणून चेन्नईत प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईचे वर्णन करण्यात येत असून, या विभागाने येथे आतापर्यंत जप्त केलेल्या १४२ कोटींच्या धनसंपत्तीत शनिवारी २४ कोटी रुपयांच्या नोटांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या सर्व नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत.

तमिळनाडूमध्ये वाळू उपसा करणाऱ्या एका कंपनीकडून ही बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कंपनीच्या दोन कार्यालयांवर आणि कंपनीच्या मालकांच्या दोन निवासस्थानांवर गेल्या गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. दोन दिवस चाललेल्या त्या कारवाईत तब्बल १४२ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली. त्यात सोने आणि चलनी नोटांचा समावेश आहे. याबाबत नवी दिल्लीत केंद्रीय थेट कर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात ९६.८९ कोटींच्या जुन्या ५००, हजाराच्या, तर ९.६३ कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा सापडल्या.

Robin Hood thief from Bihar
फक्त स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने करायचा घरफोडी; बिहारच्या ‘रॉबिन हूड’ला केरळमध्ये केलेली चोरी पडली महागात
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

ही सर्व संपत्ती आपली असल्याचे एस. रेड्डी या सरकारी कामे करणाऱ्या कंत्राटदाराने म्हटले आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे. शनिवारी आणखी घबाड हाती आले ते या चौकशीतूनच. वेल्लोर येथील एका कारमध्ये पैसे असल्याची माहिती या चौकशीतून उघड झाल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. त्यात २४ कोटी रुपये सापडले. हे पैसे दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत.

कोठून येतात नव्या नोटा?

मोदी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्यांचे स्वकष्टाचे पैसे मिळण्यिासाठीही तासन् तास रांगा लावाव्या लागत आहेत. एवढे होऊनही पैसे मिळतीलच याची हमी नाही. असे असताना अशा प्रकारे नव्या दोन हजारांच्या नोटांच्या स्वरूपात रेड्डी याच्यासारख्या सरकारशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींकडे मात्र कोटय़वधी रुपये सापडत असल्याचे पाहून प्राप्तिकर विभागाचे अधिकारीही अचंबित झाले आहेत. या नोटा कोठून येत आहेत, याची चौकशी करण्यात येत असल्याचे या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.