निश्चलनीकरणानंतरची सर्वात मोठी बेहिशेबी धनाची जप्ती म्हणून चेन्नईत प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईचे वर्णन करण्यात येत असून, या विभागाने येथे आतापर्यंत जप्त केलेल्या १४२ कोटींच्या धनसंपत्तीत शनिवारी २४ कोटी रुपयांच्या नोटांची भर पडली आहे. विशेष म्हणजे या सर्व नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तमिळनाडूमध्ये वाळू उपसा करणाऱ्या एका कंपनीकडून ही बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कंपनीच्या दोन कार्यालयांवर आणि कंपनीच्या मालकांच्या दोन निवासस्थानांवर गेल्या गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. दोन दिवस चाललेल्या त्या कारवाईत तब्बल १४२ कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती आढळून आली. त्यात सोने आणि चलनी नोटांचा समावेश आहे. याबाबत नवी दिल्लीत केंद्रीय थेट कर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या छाप्यात ९६.८९ कोटींच्या जुन्या ५००, हजाराच्या, तर ९.६३ कोटी रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा सापडल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai sand contractor black money
First published on: 11-12-2016 at 01:24 IST