पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश मियां साकिब निसार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. त्यावरून त्यांची खिल्ली उडवली जात आहे. व्हिडीओमध्ये मियां साकिब निसार यांनी सांगितलेला पाण्याचा फॉर्मुला सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार गुल बुखारी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या पाकिस्तानमध्ये पाण्याची प्रचंड समस्या आहे. काही भागांमध्ये दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. देशातील पाण्याची समस्या पाहून बोलताना पाण्याचा फॉर्मुला सांगितला. मियां साकिब निसार यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाण्याची निर्मीती होण्याचे चार सुत्रे आहेत. त्यापैकी एकाही सुत्रापासून पाकिस्तान पाण्याची निर्मीती करू शकत नाही. पाण्याच्या निर्मीतीसाठी आपल्याजवळ ‘H2Zero’ फॉर्मुला आहे. शून्य ऐवजी त्यांनी झिरोचा उल्लेख केला. त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाण्याचा फॉर्मुला H2O आहे. मात्र, पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश मियां साकिब निसार यांच्यानुसार पाण्याचा फॉर्मुला H2Zero आहे.

How did I miss this?

Chief Justice of Pakistan: We have the formula for water, H 2 0

(Not H 2 O) pic.twitter.com/YXAs1ETfgl

— Gul Bukhari (@GulBukhari) October 22, 2018

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief justice of pakistan and his formula for water goes viral
First published on: 24-10-2018 at 15:03 IST