संशोधकांना असे आढळले आहे की आजच्या प्रौढांच्या तुलनेत आजच्या मुलांना हवामानाच्या तीव्रतेमुळे जास्त त्रास होईल.अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल ‘सायन्स’ मध्ये प्रकाशित झाले आहेत. २०२१ मध्ये जन्म झालेल्या बालकांना त्यांच्या आयुष्यात आत्तांच्या प्रौढांच्या तुलनेत दुपटीने जास्त प्रमाणात वातावरणीय समस्यांचा सामना करावा लागणार आहे. संशोधकांना इंटर-सेक्टरल इम्पॅक्ट मॉडेल इंटरकंपेरिसन प्रोजेक्ट (ISIMIP) च्या डेटावर आधारित हे निष्कर्ष काढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्लासगो येथे आगामी जागतिक हवामान परिषद COP26 मध्ये हरितवायू उत्सर्जनासंबंधी चर्चा करण्यात येईल.”आमचे निष्कर्ष तरुण पिढ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका दर्शवतात आणि त्यांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी तीव्र उत्सर्जन कमी करण्याची मागणी करतात,” असे व्रिज युनिव्हर्सिटी ब्रुसेलचे मुख्य लेखक विम थियरी यांनी सांगितले.

जीवाश्म इंधनाचा वापर थांबवून जर आपण तापमान 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत मर्यादित केले तर आपण आपल्या मुलांच्या खांद्यावरुन हवामानाच्या दुष्परिणामांचा बराचसा भार हलका करु शकतो,” ISIMIP चे समन्वयक काटजा फ्रीलर म्हणाल्या. त्या पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च इथल्या प्रमुख संशोधक आणि अभ्यासाचे सह-लेखक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children born in 2021 to be twice as affected by climate change study vsk
First published on: 01-10-2021 at 10:29 IST