चीनच्या लष्करासाठी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले असून ते चार कि.मी. पर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. रशिया व अमेरिकेच्या अत्याधुनिक अशा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांशी तुलना करता येईल असे चीनचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे असा दावा करण्यात आला. 
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या लष्कराच्या पायदळाने हे क्षेपणास्त्र तयार केले असून एचजे १२ असे त्याचे नाव आहे ते चार कि.मी. अंतरापर्यंत रणगाडे नष्ट करू शकते.
चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप या कंपनीने हे क्षेपणास्त्र विकसित केले असून संरक्षण कंत्राटदार कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. पाश्चिमात्य व रशियन रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची बरोबरी करणारे हे क्षेपणास्त्र असून त्यामुळे चीनला आंतरराष्ट्रीय लष्करी साधनांच्या बाजारपेठेतही मोठे स्थान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2014 रोजी प्रकाशित  
 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र चीनमध्ये विकसित
चीनच्या लष्करासाठी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले असून ते चार कि.मी. पर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते.
  First published on:  28-08-2014 at 03:35 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China develops new anti tank missile