चीनच्या शेंझेन या शहरात एका औद्योगिक वसाहतीत दरड कोसळल्याने ३३ इमारती गाडल्या गेल्या आहेत. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ९५ जण बेपत्ता असून मोठ्या जीवीतहानीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरड कोसळ्यानंतर गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीतील तब्बल १ लाख चौरस मीटर जागा ढिगाऱयाखाली गेली आहे. यात अनेकजण दगावल्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, या घटनेने २०१४ साली पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळ माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेची आठवण करून दिली. दरड कोसळल्याने माळीण हे अख्ख गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं.