चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग ७ ते १० मे दरम्यान रशियाला भेट देणार आहेत. रशियाच्या विजय दिनानिमित्त संचलनाला ते उपस्थित राहतील. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याबरोबर ते सामरिक पातळीवरील संवाद साधतील. विविध आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक घडामोडींवर ते चर्चा करतील. जिनपिंग यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२४मध्ये ब्रिक्स परिषदेनिमित्त रशियाला भेट दिली होती.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली. ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध संपविण्यासाठी पुतिन यांच्यावर टाकलेला दबाव आणि चीनबरोबर सुरू असलेल्या करयुद्धाचा यात प्रामुख्याने समावेश असेल. जिनपिंग यांच्या रशिया दौऱ्यात दोन्ही देशांत विविध करारांवर सह्या होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही विजय दिनानिमित्त आयोजित संचलनाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. पण, मोदींऐवजी संरक्षणमंत्री राजनाथसिंह या संचलनाला उपस्थित राहतील, असे आधी ठरले. मात्र, नंतर सिंह यांनीही जाणे रद्द केले असून संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ जाणार आहेत.