वॉशिंग्टन : व्यापारातील तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढीव शुल्कावरील चर्चेबाबत सहमती झाल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनच्या अध्यक्षांशी केलेल्या संभाषणानंतर सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संभाषणाची पुष्टी केली असून, ट्रम्प यांनीच संपर्क केल्याचे म्हटले आहे. ‘व्हाईट हाऊस’ने यावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘चीनचे अध्यक्ष जिनपिंग माझे आवडते मित्र आहेत आणि नेहमीच राहतील, परंतु ते खूप कठोर आहेत, त्यांच्याशी व्यवहार करणे अत्यंत कठीण आहे’, असा संदेश ट्रम्प यांनी बुधवारी त्यांच्या ‘समाज माध्यमा’वर प्रसारित केला आहे. दोन्ही देशांमधील रखडलेल्या शुल्क वाटाघाटींमुळे जागतिक व्यापारात तणाव निर्माण झाला आहे.