चीनची लढाऊ जेट विमाने जपानने दावा सांगितलेल्या बेटांवर आता गस्त घालीत असून आयसलेट बेटांवर चीनने हवाई सुरक्षा क्षेत्र घोषित केल्याने दोन्ही देशात तणाव वाढला आहे.
पीपल्स लिबरेशन फोर्सचे प्रवक्ते शेन जिन्के यांनी सांगितले की, दोन मोठी स्काउट विमाने गस्त घालीत असून पूर्वसूचना विमाने व काही लढाऊ विमानेही या बेटांकडे पाठवली आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांन्वये ही गस्त घालण्यात येत असल्याचा दावा शेन यांनी केला आहे. चीनने वादग्रस्त मानलेल्या डियाउ व जपानने वादग्रस्त ठरवलेल्या सेनकाकू बेटांवर ही विमाने गस्त घालत होती की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.
तत्पूर्वी आमच्या हवाई संरक्षण विभागात येण्याच्या अगोदर जपानला परवानगी घ्यावी लागेल अन्यथा आपत्कालीन संरक्षण योजनांचा सामना करावा लागेल, असा इशारा चीनच्या संरक्षण मंत्रालयाने दिला. चीनच्या विमान हद्दीत प्रवेशताना परराष्ट्र मंत्रालयास सूचना द्यावी लागते.