आपल्या पतींना देण्यात आलेल्या २६ लाख युरोंच्या लाच रकमेतूनच फ्रान्समध्ये आम्ही आलिशान बंगला विकत घेतला असल्याची कबुली बो झिलाई यांच्या पत्नीनेच दिल्यानंतर चीनमधील भ्रष्टाचार प्रकरणात अडकलेले कम्युनिस्ट नेते झिलाई यांची पंचाईत झाली आहे. दोषमुक्त होण्यासाठी बो यांच्याकडून केली जाणारी धडपड त्यांच्याच पत्नीच्या गौप्यस्फोटामुळे केविलवाणी ठरली आहे.
सत्तेचा दुरुपयोग, भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफर असे आरोप ६४ वर्षीय बो झिलाई यांच्याविरोधात निश्चित करण्यात आले असून या अत्यंत प्रतिष्ठेच्या खटल्याचा शुक्रवारी दुसरा दिवस पार पडला.
झिलाई यांच्या पत्नी ग्यू कैलाई यांच्या कबुलीजबाबामुळे बो यांच्या चंगळवादी प्रवृत्तीवर प्रकाश पडला आहे. चीनच्या आर्थिक सुधारणा आणि बो यांच्या जीवनशैलीतील आमूलाग्र बदल हे समांतर पद्धतीने सुरू होते, याचे पुरावेही या खटल्यादरम्यान समोर आले.
ब्रिटनचे उद्योजक नील हेवूड यांनी दिलेल्या ‘देणगी’तून फ्रान्समध्ये आलिशान बंगला खरेदी केल्याचे ग्यू यांनी स्पष्ट केले. २०११ मध्ये ग्यू यांचा मुलगा बो ग्वांग्वा याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नील हेवूड यांची हत्या करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
लाचखोरीच्या आरोपातून मुक्त होण्यासाठी बो झिलाई यांची केविलवाणी धडपड
आपल्या पतींना देण्यात आलेल्या २६ लाख युरोंच्या लाच रकमेतूनच फ्रान्समध्ये आम्ही आलिशान बंगला विकत घेतला असल्याची कबुली बो झिलाई यांच्या पत्नीनेच
First published on: 24-08-2013 at 04:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinas media calls bo xilai a liar as trial enters second day