चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी भारतीय पंतप्रधानांना आपल्या देशात येण्याचे आमंत्रण दिले आहे. भारतात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने चीनकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना आपल्या देशात येण्यासाठी आमंत्रण देणारे ली केकियांग हे पहिलेच आंतराष्ट्रीय नेते आहेत. यापूर्वी ली केकियांग यांनी पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींना फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. नरेंद्र मोदींनीसुद्धा चीनच्या पंतप्रधानांचे आभार मानताना आंतरराष्ठ्रीय धोरणे ठरवताना चीनला नेहमीच प्राधान्य दिले जाईल असे सांगितले. तसेच भारत आणि चीनमधील सुसंवाद अधिक वाढवून या दोन्ही देशांतील व्यापारी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत दोन्ही नेत्यांचे एकमत झाले होते.
  संग्रहित लेख, दिनांक 29th May 2014 रोजी प्रकाशित  
 भारतीय पंतप्रधानांना चीनचे आमंत्रण; द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे प्रयत्न
चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी भारतीय पंतप्रधानांना आपल्या देशात येण्याचे आमंत्रण दिले आहे. भारतात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने चीनकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे समजते.

  First published on:  29-05-2014 at 04:54 IST  
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinese premier calls narendra modi express desire to develop ties