पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा पोलिस आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद उफळला आहे. पुर्व मिदनापूरमधील पाटशपुरमध्ये कथितरित्या भाजपा कार्यकर्त्यांची तृणमुल काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडवणुक केल्याने हा वाद उद्भवला आहे.
भाजपा कार्यकर्ते ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या निदर्शनांच्या कार्यक्रमाचा प्रचार करत होते. यादरम्यान काही टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांची वाहन अडवली. यामुळे संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यालयाबाहेर निर्दशनं सुरू केली व रस्ता अडवला. परिणामी घटनास्थळी पोलिस दाखल झाली व त्यांनी आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी हटवण्यासाठी बळाचा वापर सरू केला. यावेळी उद्भवलेल्या वादात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा भाजपा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. शिवाय घटनास्थळी वाहनांची देखील तोडफोड झाली.