दिल्लीतील बदरपूर येथील एका केंद्रीय विद्यालयात बसण्याच्या जागेवरून एक धक्कादायक प्रकार घडला असून एका विद्यार्थ्याने धारदार ब्लेडने आपल्या वर्गमित्रावरच वार केले आहेत. यामध्ये पीडित मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


या दोघांमध्ये बसण्याच्या जागेवरुन सुरु असेलला वाद इतका विकोपाला गेला की, काही मुलांनी हे कृत्य केले. पीडित मुलाने आरोप केला आहे की, शाळेतील शिक्षकांनी देखील ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे हल्लेखोरांवर अदयापही कोणतीही कारवाई झालेली नाही. दरम्यान, पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, शाळेतील दोन विद्यार्थी एकाच जागेवर बसण्यासाठी अडून बसले होते. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर एका विद्यार्थ्यांने आपल्या काही मित्रांच्या मदतीने संबंधीत विद्यार्थ्याचा बदला घेण्याचे ठरवले. त्यानुसार, या विद्यार्थ्यांच्या गटाने त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर आणि कमरेवर ब्लेडने वार केले. त्यामुळे पीडित विद्याऱ्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पीडित विद्यार्थ्यावर अशा पद्धतीने ब्लेडचे वार करण्यात आले ज्यामुळे त्याचा शर्ट फाटून पाठीवरून कंबरेवर गंभीर जखम झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class 7th student at central school in badarpur attacked allegedly by a group of students with blade yesterday following an argument with a classmate over a seat
First published on: 14-07-2018 at 07:21 IST