उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या उद्योगसमूहातील हिंदाल्को या कंपनीला ओदिशातील कोळसा खाणींच्या अधिकारपदाचा गैरवापर करून वाटप केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी माजी कोळसा सचिव पी़ सी़ पारख यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पाचारण केले आह़े २५ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचे समन्स पारख यांना बजाविण्यात आले आहेत़
६९ वर्षीय पारख यांनी त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी नेहमीच सीबीआय आणि सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांच्यावर टीका केली आह़े शुक्रवारी त्यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येणार आह़े छाननी समितीचे निर्णय बदलण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, याची चौकशी या वेळी केली जाईल, असा अंदाज मंगळवारी अधिकृत सूत्रांनी व्यक्त केला़
तलाबीरा-२ हा कोळसा विभाग नेयवेली लिग्नेट लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला देण्यात यावा, असे छाननी समितीने स्पष्ट केलेले असताना पारख यांनी हा निर्णय बदलून हिंदाल्कोला हा विभाग दिला़ पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून आलेला बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा प्रस्ताव संमत करताना हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप पारख यांच्यावर आह़े
पारख, बिर्ला आणि हिंदाल्को आणि कोळसा मंत्रालयाच्या काही अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात या प्रकरणी सीबीआयने गेल्या वर्षी गुन्हा दाखल केला होता़ २००५मध्ये गुन्हेगारी कट केल्याचा आणि पारख यांनी पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आह़े
संग्रहित लेख, दिनांक 23rd Apr 2014 रोजी प्रकाशित
कोळसा घोटाळा : माजी सचिव पारख यांना समन्स
उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या उद्योगसमूहातील हिंदाल्को या कंपनीला ओदिशातील कोळसा खाणींच्या अधिकारपदाचा गैरवापर करून वाटप केल्याच्या
First published on: 23-04-2014 at 12:38 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal scam cbi summons pc parakh for questioning on 25 april