कोळसा खाण वाटप घोटाळ्यातील आरोपी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि नागपूरस्थित उद्योगपती मनोज जयस्वाल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. दर्डा पिता-पुत्र आणि जयस्वाल शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयापुढे हजर झाले होते.
दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तिन्ही आरोपींनी तपासकार्यात सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना कारागृहात टाकण्याचे काहीच कारण नाही. त्यांचा जामीन अर्ज स्वीकारण्यात येत आहे, असे विशेष न्यायालयाचे न्या. मधू जैन यांनी म्हटले आहे. सीबीआयने या तिघांच्याही जामीन अर्जाला विरोध केला होता. न्यायालयाने दर्डा पिता-पुत्र आणि जयस्वाल यांच्याविरोधात सात मे रोजी समन्स बजावले होते. त्यामुळे हे तिघेही शुक्रवारी न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी जामीनासाठी अर्ज केला.
संग्रहित लेख, दिनांक 23rd May 2014 रोजी प्रकाशित
कोळसा खाण घोटाळ्यातील आरोपी विजय आणि देवेंद्र दर्डा यांना जामीन
दर्डा पिता-पुत्र आणि जयस्वाल शुक्रवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयापुढे हजर झाले होते.

First published on: 23-05-2014 at 04:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal scam mp darda son get bail