Coimbatore Car Cylinder Blast Case: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आदी राज्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. सकाळापासून एनआयएच्या पथकाने तब्बल १०० ठिकाणी छापेमारी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयएसआयएस व्हिडीओंद्वारे आपल्या संघटनेत तरुणांना भरती करत आहे. एनआयएला मागील काही दिवसांमध्ये अशाप्रकारच्या व्हिडीओंची माहिती मिळाली होती, की तुरूणांना व्हिडीओद्वारे भडकवलं जात आहे. एनआयएची टीम कोईम्बतुरच्या कार सिलिंडर स्फोटाचाही तपास करत आहे. यासंबंधीही अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

कोईम्बतुर स्फोटात मारला गेला होता एक दहशतवादी –

२३ ऑक्टोबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या उक्कडममध्ये कोट्टाईमेडु येथे कोट्टई ईश्वरन मंदिरासमोर एका कारमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या हल्ल्यात एक संशयित दहशतवादी जेम्स मुबीन ठार झाला होता. तपास यंत्रणांनी या प्रकरणी मुबीनच्या घरातून मोठ्याप्रमाणात स्फोटकं जप्त केली होती. या प्रकरणात अगोदरच सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

More Stories onएनआयए
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coimbatore blast case nia raids at around 100 locations in one attempt terrorists are being promoted through videos from isis msr
First published on: 15-02-2023 at 13:40 IST