पश्चिम म्यानमारमध्ये जातीय हिंसाचारात पाच जण ठार झाले. थंडवे येथे उसळलेल्या दंगलींमुळे महिला आणि मुले जंगलांमध्ये लपून बसले असून, सुरक्षा दलाने तणावग्रस्त भागात गस्त सुरू केली आहे. राष्ट्राध्यक्ष थेईन सेईन रकानी प्रांताला भेट देतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेने या जातीय दंग्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत असे आवाहन अमेरिकेने केले आहे. ८०० दंगलखोरांनी थंडवे येथे घरांवर हल्ले केले. यात अनेक घरांची जाळपोळ करण्यात आली. जून २०१२ पासून देशभरातील जातीय दंगलीमध्ये अडीचशे लोकांना जीव गमवावा लागला असून एक लाख चाळीस हजार नागरिक बेघर झाले आहेत.