संपूर्ण देशात कॉंग्रेसची अवस्था बुडणाऱया नौकेसारखी झाली असून, पूर्वकिनारी राज्यांमध्येही तिच स्थिती असल्याची टीका ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी सोमवारी केली.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ओडिशातील सरकारवर केलेल्या टीकेला पटनाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी ओडिशातील बिजू जनता दलाच्या सरकारवर केलेले आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. संपूर्ण देशात कॉंग्रेसची अवस्था बुडणाऱया नौकेसारखी झाली आहे.
राहुल गांधी यांनी रविवारी जाहीर सभेत पटनाईक सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून, केंद्राकडून येणाऱया निधीचा गैरवापर करण्यात आला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्याला पटनाईक यांनी लगेचच उत्तर दिले आहे.