देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात व केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील अलका चौकात आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात पुण्यातील अलका आंदोलनास सुरूवात झाली आहे. राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, पटणा, बंगळुरू आदी प्रमुख शहारांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरूवात झाली आहे.

अहमदाबादमध्ये आक्रमक झालेल्या आंदोलक काँग्रेस कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापरही करावा लागला. बंगळुरूमध्ये काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे सायकल चालवत आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह रवाना झाले. तर, पटणामध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सायकल. बैलगाडी व घोडागाडी चालवून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवला. दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने देखील आयपी कॉलेज चौकात इंधन दरवाढी विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली.

Bengaluru: Congress leader and former Karnataka CM Siddaramaiah rides a bicycle from his residence to reach Minsk Square, to participate in party’s protest against the hike in fuel prices. pic.twitter.com/DTo8eMzwJR

— ANI (@ANI) June 29, 2020

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सतत वाढत आहेत. काँग्रेसने वाढत्या इंधन दरावरुन राज्यभरात आंदोलन पुकारलं असताना सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात पाच पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे. इंधनाचे दर रोज वाढत असताना रविवारी मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress aggressive against fuel price hike intense protests across the country msr 87 svk
First published on: 29-06-2020 at 11:20 IST