काँग्रेसची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये जुन्या अनुभवी आणि नव्या नेत्यांमध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार, पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह, कमलनाथ, सुशीलकुमार शिंदे, मोहनप्रकाश, सी. पी. जोशी, आणि जनार्दन द्विवेदी यांना यातून वगळण्यात आले आहे. २२ जुलै रोजी नव्या कार्यकारिणीची पहली बैठक बोलावण्यात आली आहे. या कार्यकारिणीत २३ सदस्य, १९ स्थायी आमंत्रित सदस्य आणि ९ आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. राहुल गांधी या राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष असतील. पक्षाचे संगठन महासचिव अशोक गहलोत यांनी याबाबत माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कोषाध्यक्ष मोतीलाल वोरा, अशोक गहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि ओमान चांडी यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत, वरिष्ठ नेते आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीणा आणि गैखनगम यांचा समावेश आहे.

स्थायी आमंत्रित सदस्यांमध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, ज्योतिरादित्य शिंदे, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पी. सी. चाको, जितेंद्र सिंह, आरपीएन सिंह, पीएल पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुंटिया, अनुग्रह नारायण सिंह, राजीव सातव, शक्तीसिंह गोहिल, गौरव गोगोई आणि ए. चेल्लाकुमार यांचा समावेश आहे.

विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये के. एच. मुनियप्पा, अरुण यादव, दिपेंद्र हुड्डा, जीतिन प्रसाद, कुलदीप विश्नोई, इंटकचे अध्यक्ष जी. संजीव रेड्डी, भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, एनएसयुआयचे अध्यक्ष फिरोज खान, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव आणि काँग्रेस सेवा दलाचे मुख्य संगठक लालजीभाई देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress announces new national executive digvijay singh kamal nath janardhan dwivedi dropped out
First published on: 17-07-2018 at 22:21 IST