देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे कार्यकर्ते आणि भाजपचे माजी नेते रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी शपथ घेतली. कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात संघ परिवाराला पसंत पडतील अशा विचारांचा उल्लेख केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. कोविंद यांनी भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानववादाचा उल्लेख केला. हाच मुद्दा उपस्थित करत काँग्रेसने कोविंद यांच्यावर टीका केली आहे. कोविंद यांनी आपल्या पहिल्याच भाषणात देशाचा आणि गांधींचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. कोविंद यांनी आपल्या भाषणात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू किंवा अन्य काँग्रेस नेत्यांचा उल्लेख न केल्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काँग्रेस नेते गुलामनबी आझाद म्हणाले, पंडित दिनदयाल उपाध्याय यांची महात्मा गांधींशी तुलना आणि जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख न करणे हा देशाचा अपमान आहे. हा महात्मा गांधी आणि इतर स्वातंत्र्य सैनिकांचाही अपमान आहे. या गोष्टींचा भाषणात उल्लेख नसायला पाहिजे होता. आम्हाला अपेक्षा होती की, आता ते देशाचे राष्ट्रपती आहेत. भाजपचे नव्हे, राष्ट्रपती सर्वांचे असतात. पण हे दुर्दैव आहे की, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचा उल्लेख करण्यात आला नाही. नेहरू एका स्वातंत्र्य सैनिकाचे पूत्र होते. त्यांची मुलगी, नातूने देशासाठी जीव दिला आहे. मोतीलाल नेहरूंपासून राजीव गांधींपर्यंत त्यांनी कोणाचाच उल्लेख केला नाही. हे सर्व जाणूनबुजून केल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress criticized on president ram nath kovind for comparison of deen dayal upadhyay with mahatma gandhi
First published on: 26-07-2017 at 11:16 IST