कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी सलग सहाव्यांदा कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी बेंगलुरू-मैसूर या ११८ किलोमीटरच्या महामार्गाचं उद्घाटन केलं. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मांड्यात सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “डबल इंजिन सरकारचा उद्देश तुमच्या प्रेमाची परतफेड ‘विकासा’च्या रूपात करण्यात आहे. लोक बेंगलुरू-मद्रास महामार्गाबद्दल बोलत आहेत. त्याचे फोटो व्हायरल करत आहेत. देशातील तरूणांमध्ये या प्रकल्पाबाबत उत्साह दिसून येत आहे.”

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Sharad Pawar on PM Narendra Modi
“सत्ता राखण्यात मोदीजी इतके तल्लीन झाले की, त्यांना…”; चीनच्या कुरापतीवरून शरद पवार गटाची पंतप्रधानांवर टीका
Leaders of India will have a power show tomorrow and organize a meeting at Ramlila ground in Delhi
‘इंडिया’च्या नेत्यांचे उद्या शक्तिप्रदर्शन, दिल्लीत रामलीला मैदानावर सभेचे आयोजन; विरोधकांच्या एकजुटीला बळ

हेही वाचा : “राहुल गांधींना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या!” भाजपा नेत्याची मागणी, जमीनही सुचवली

“काँग्रेस आणि त्यांचे मित्र मोदींची कबर खोदण्याचं स्वप्न पाहत आहेत. काँग्रेस मोदींची कबर खोदण्यात व्यस्त आहे. पण, मोदी बेंगलुरू-म्हैसूर महामार्ग बनवण्यात व्यस्त आहे. तसेच, मोदी गरिबांचं जीवन सुखकर करण्यात व्यस्त आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितलं.

हेही वाचा : आधी सैन्यातील वडिलांचा अभिमान, आता लैंगिक छळाचे आरोप, नेटीझन्स दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांवर संतापले, म्हणाले…

“२०१४ पूर्वीच्या केंद्रातील काँग्रेस सरकारने देशातील गरिबांना उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांचा पैसा लुटला. पण, गेल्या नऊ वर्षात गरिबांसाठी ३ कोटींहून घरे बनवण्यात आली. त्याअंतर्गत कर्नाटकातही लाखो नागरिकांना घरे देण्यात आली. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत कर्नाटकातील ४० लाख कुटुंबांना नळाचे पाणी देण्यात आलं,” अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.