काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यांनतर आता एका काँग्रेस खासदारालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘सिद्धू मुसेवाला सारखेच तुमचे हाल केले जातील’ अशा आशयाचा मेसेज व्हॉट्सॲपवर आला आहे.

सलमान आणि सलीम खान यांनाही धमकी
लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू (Ravneet Singh Bittu) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज व्हॉट्सॲपवर आला आहे. यात ‘सिद्धू मुसेवाला सारखेच तुमचे हाल केले जातील’ असे लिहिण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान (salman khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाले होते. ‘सलमानचा सिद्धू मुसेवाला करू’ असे त्या पत्रात लिहण्यात आले होते. या प्रकरणी सलीम खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सुरक्षा कमी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हत्या
पंजाब सरकारने गायक सिद्धू मुसेवालाची सुरक्षा कमी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुसेवालाच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. मुसेवालावर गोळीबार केलेल्या आरोपींपैकी तीन आरोपी पंजाबचे असल्याचे सांगण्यात येत आहे.