डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आतापर्यंतच्या सर्वांत खालच्या स्तरावर गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. महागाईमुळे जनतेत हाहाकार पण ५६ इंच छातीवाले गप्प का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गांधी यांनी यासंबंधी ट्विट शेअर केला आहे. ते म्हणतात, रुपया गया 73 पार, महँगाई मचाए हाहाकार। तेल-गैस में लगी है आग, बाजार में मची भागम-भाग। वो 56 इंच के सीने वाले का कब तक चलेगा ‘साइलेंट मोड’, कहां है ‘अच्छे दिन का कोड?

बुधवारी शेअर बाजार सुरु होताच एका डॉलरची किंमत ७३ रुपये ३४ पैसे इतकी झाली. मागील सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ घसरुन ७२.९१ च्या स्तरावर बंद झाला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress president rahul gandhi arises question on pm narendra modi for silence on rupee fall
First published on: 04-10-2018 at 03:46 IST