राहुल गांधी यांचं केंब्रिज विद्यापीठातील भाषणाचं प्रकरण थांबलं नाही तोच आता नवीन प्रकरण सुरू झालं आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एक वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल चौकशीसाठी दिल्ली पोलिसांनी १६ मार्च रोजी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली. नोटीशीला उत्तर मिळालं नसल्याने आता पोलिसांचं एक पथक पोलीस आयुक्तांसह राहुल गांधी यांच्या घरी दाखल झालं. यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यांनी सरकारवर आरोप केला आहे की, “हे सरकार राजकीय बदल्याच्या भावनेतून काम करत आहे.” सिंघवी म्हणाले की, “राहुल गांधी यांनी वक्तव्य करून ४५ दिवसांनंतर दिल्ली पोलिसांना अचानक कशी काय त्या वक्तव्याची आठवण झाली?”
काय म्हणाले होते राहुल गांधी?
राहुल गांधी ३० जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये एका सभेत म्हणाले होते की, “ या यात्रेदरम्यान अनेक महिला मला भेटायला आल्या होत्या, त्या रडत होत्या, त्यापैकी काही महिलांनी मला सांगितलं की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचं लैंगिक शोषण झालं आहे. मी त्या महिलांना म्हणालो की, मी पोलिसांना याबद्दल सांगू का. ते या प्रकरणी कारवाई करतील. त्यावर त्या महिला मला म्हणाल्या की, राहुलजी ही गोष्ट आम्हाला फक्त तुम्हाला सांगायची होती. पोलिसांना याबद्दल काही सांगू नका. अन्यथा आम्हाला अधिक त्रास सहन करावं लागेल.”
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर दिल्ली पोलिसांनी तब्बल ४५ दिवसांनी १६ मार्च रोजी राहुल गांधी यांना नोटीस पाठवली. पोलीस राहुल गांधींना म्हणाले की, “आम्हाला त्या महिलांची माहिती द्या जेणेकरून आम्ही दोषींवर कारवाई करू शकू आणि गुन्हे रोखू शकू.”
हे ही वाचा >> दिल्लीतलं वातावरण तापलं, पोलीस राहुल गांधींच्या घरी दाखल; चौकशीबाबत विचारताच म्हणाले, “थोडा वेळ…”
“छळ, सूड आणि धमकावण्याचे राजकारण सध्या सुरू” असल्याचा आरोप अभिषेक मनू सिंघवी यांनी केला आहे. सिंघवी म्हणाले की, “राहुल गांधी यांनी चार हजार किलोमीटरची यात्रा केली. यावेळी ते हजारो महिलांना भेटले. त्यापैकी तक्रार करणाऱ्या त्या महिलांची माहिती लगेच कशी देता देईल.