ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २३८ जणांचा मृत्यू तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर राजकीय टीका-टीप्पणी सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षाने रेल्वेच्या ‘कवच’ यंत्रणेवर सवाल उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. श्रीनिवास यांनी रेल्वे अपघातावरून केंद्र सरकारवर टीकास्र डागलं आहे. बी. श्रीनिवास यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा ‘कवच’ची माहिती देतानाचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यावर लिहिलं की, “जेव्हा रेल्वे एका रुळावरून दुसऱ्या रुळावर आली होती, तेव्हा ‘कवच’ कुठं होते? ३०० च्या जवळपास मृत्यू आणि १ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या मृत्यूंना जबाबदार कोण?,” असा सवाल बी. श्रीनिवास यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : ओडिशात रेल्वे अपघातात २३८ जणांचा मृत्यू, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जे लोक…”

रेल्वे ‘सुरक्षा कवच’ कसं काम करते?

भारतीय उद्योगाच्या सहकार्याने स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली ‘कवच’ हे रिसर्च डिझाईन आणि स्टँडडर्स ऑर्गनायझेशने विकसित केलं आहे. हे तंत्रज्ज्ञानाच्या मदतीने भरघाव वेगाने दावणाऱ्या दोन गाड्या समोरा-समोर आल्या तरी त्यांची टक्कर होणार नाही. तसेच, लाल सिग्नल ओलांडताच रेल्वेल आपोआप ब्रेक लागेल.

जर, मागूनही एखादी रेल्वे येत असेल, तीही आपोआप थांबेल. रेल्वे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असेल, तरीही दुसरी रेल्वे समोर आल्यावर आपोआप ब्रेक लावला जाईल, असं दक्षिण मध्य रेल्वेने सांगितलं होतं.

हेही वाचा : “याला जबाबदार कोण?” ओडिशातील अपघातानंतर विवेक अग्निहोत्रींचा संताप, म्हणाले, “अतिशय लज्जास्पद…”

“मोदी सरकारसाठी फक्त ‘वंदे भारत’ रेल्वेतच नागरिक…”

राष्ट्रीय जनता दलाने ( राजद ) अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा मागितला आहे. राजने ट्वीट करत लिहिलं की, “‘कवचं’ मध्येही कांड झाला का? मोदी सरकारसाठी फक्त ‘वंदे भारत’ रेल्वेतच नागरिक प्रवास करतात. रेल्वेमंत्र्यांमध्ये नैतिकता असेल, तर तातडीने राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी राजदने केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress youth leader b shrinivas question over railway kavach ashwini waishnav after odisha train accident ssa
First published on: 03-06-2023 at 14:10 IST