मणिपूर : लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला ; कर्नलसह सहा जणांचा मृत्यू!

या दहशतवादी हल्ल्यात कर्नलच्या पत्नी व मुलाचा देखील मृत्यू झाला आहे.

मणिपूरमध्ये लष्कराच्या एका ताफ्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कारतील कर्नल, त्यांची पत्नी व मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जवान देखील शहीद झाले आहेत. मागील अनेक वर्षांमधील या क्षेत्रात झालेला हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, ही घटना शनिवार सकाळी जवळपास १० वाजता मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ घडली. आसाम रायफल्सच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Convoy of a commanding officer of an assam rifles unit ambushed by terrorists msr