देशातील करोना रुग्णसंख्येत चढ उतार सुरूच आहे. काल अवघे ३१ हजार रुग्ण आढळल्यानंतर आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात ३७ हजार ८७५ करोना रुग्ण आढळले असून ३६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३९ हजार ११४ जणांनी करोनावर मात केली आहे. नवीन बाधितांसह देशभरातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३० लाख ९६ हजार ७१८ झाली आहे.

देशात सध्या ३ लाख ९१ हजार २५६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत ३ कोटी २२ लाख ६४ हजार ५१ जण करोनातूनन बरे झाले आहेत. तर, ४ लाख ४१ हजार ४११ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत केरळमध्येही पुन्हा रुग्णसंख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. देशात सापडलेल्या रुग्णसंख्येपैकी तब्बल २५ हजार ७७२ बाधित एकट्या केरळमधील असून १८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांत ७८ लाख ४७ हजार ६२५ जणांना करोनाची लस देण्यात आली. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ७० कोटी ७५ लाख ४३ हजार १८ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

राज्यातील परिस्थिती..

बुधवारी दिवसभरात ३ हजार ८९८ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३ हजार ३ हजार ५८१ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय राज्यात ८६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३,०४,३३६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,९३,६९८ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७८९७ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.