ब्रिटनमध्ये शाळकरी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येणार असून १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझर  – बायोएनटेक लशीची पहिली मात्रा देण्यास पुढील आठवड्यापासून सुरुवात केली जात आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितले की, मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला मान्य करण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे आता पुढील आठवड्यापासून १२ ते १५ वयोगटातील मुलांना लस देण्यास सुरुवात करण्यात येईल. लसीकरण समितीच्या संयुक्त विद्यमाने जी शिफारस करण्यात आली त्याचे आम्ही स्वागतच करीत आहोत.  लसीकरणाचा हा कार्यक्रम काळजीपूर्वक व यशस्वीपणे राबवण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रशियाचे अध्यक्ष पुतिन विलगीकरणात

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन विलगीकरणात गेले असल्याचे रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेकोव्ह यांनी मंगळवारी जाहीर केले.  पुतिन यांच्या निकटवर्तीयांना करोनाची लागण झाल्यावर त्यांनी विलगीकरणात जाण्याचा निर्णय घेतला. पुतिन यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतातील रुग्णसंख्येत मोठी घट

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून गेल्या २४ तासांत २५,५०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही घट झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ६२ हजार २०७  झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona virus infection vaccination of school children in britain akp
First published on: 15-09-2021 at 00:20 IST