भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. दिवसाला साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण भारतामध्ये आढळून येत आहेत. दिवसाला मरण पावणाऱ्या देशातील रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. भारतामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या दोन लाखांहून अधिक झालीय. देशामधील अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळेच अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लावण्यासोबतच लॉकडाउनचाही निर्णय घेतल्याचं चित्र दिसत आहे. देशामध्ये १४ राज्यांनी कठोर निर्बंध आणि लॉकडाउन लागू केलाय. तर तितक्याच राज्यांमध्ये अंशत: निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पाहुयात कोणत्या राज्यांमध्ये आहेत कठोर निर्बंध तर कोणत्या राज्यांमध्ये आहे अंशत: सूट…

लॉकडाउन लागू करण्यात आलेली राज्ये
महाराष्ट्र
मध्य प्रदेश
राजस्थान
हरियाणा
पंजाब
हिमाचल प्रदेश
दिल्ली
उत्तर प्रदेश
बिहार
झारखंड
ओडिशा
छत्तीसगड
केरळ
कर्नाटक

अशंत: लॉकडाउन असणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश

तामिळनाडू
आंध्रप्रदेश
तेलंगण
पश्चिम बंगाल
मिझोरम
त्रिपुरा
मणिपूर
नागालँड
अरुणाचल प्रदेश
आसाम
सिक्कीम
मेघालय
उत्तराखंड
लडाख
जम्मू काश्मीर
गुजरात
गोवा</p>

India Lockdown Map

वर्ल्डोमीटर या वेबसाईटवरील माहितीनुसार शुक्रवारपर्यंत (७ मे २०२१ पर्यंत) जगभरातील १५ कोटी ६७ लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर करोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या ३२ लाख ७० हजारांहून अधिक आहे.