भारताबरोबरच जगभरातील इतर देश करोनाच्या संकटाशी दोन हात करत असतानाच करोनाचा संसर्ग जिथून सुरु झाला त्या चीनमध्ये दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहेत. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील अनेक भागांमधील बंदी उठवण्यात आली असून विमानतळं, रेल्वे स्टेशन्सवरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. अनेक पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. जवळजवळ दोन महिन्यांच्या क्वारंटाइननंतर अनेकजण घराबाहेर पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व चीनच्या अनहुई प्रांतामधील हुआंगशान पर्वत येथील पर्यटन स्थळावर तर हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याचे वृत्त सीएनएनने दिलं आहे. डोंगराळ भागात असणारे हे पर्यटनस्थळ निसर्ग सौंदर्यासाठी ओळखलं जातं. येथील प्रवेश फी काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याने जवळजवळ २० हजार पर्यटकांनी येथे गर्दी केल्याचे सांगितलं जातं आहे. या ठिकाणी दिवसभरामध्ये मर्यादित पर्यटकांना प्रवेश दिला जातो. मात्र ही मर्यादा वाढवून २० हजार करण्यात आली. त्यातच प्रवेश फी रद्द करण्यात आल्याने पहिल्या दोन दिवसांमध्येच येथे २० हजारहून अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. ही गर्दी पाहून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याची विनंती केली आहे. विषाणू पूर्णपणे नष्ट झाला नसून लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओमध्ये लोक गर्दी करुन प्रवेश मिळवण्यासाठी उभे असल्याचे दिसत आहे. यावेळेस सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसून काहीजण मास्क न लावताच या गर्दीमध्ये दिसून येत आहेत.

याचबरोबर शांघायमधील बुंड धबधबा या पर्यटनस्थळावरही मोठी गर्दी झाली होती. राजधानी बिजिंगमधील अनेक हॉटेल आणि कॅफेमध्ये लोकांची गर्दी दिसून येत होती. ही गर्दी पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांची झोप उडली आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाने गर्दी न करण्यासंदर्भातील आवाहन केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही या संदर्भात काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. चीनमधील सर्वजनिक ठिकाणे सुरु करण्यात आली असली तरी या ठिकाणी गर्दी होणार नाही याबद्दल काळजी घ्यायला हवी. करोनाचा संसर्गाची दुसरी लाट येण्यासंदर्भात तज्ज्ञांनी आधीच इशारा दिला आहे.

या गर्दीसंदर्भात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात…

यांना तिकडेच क्वारंटाइन करा

त्यांनी असं समजू नये…

हे लोकं कधीच शिकणार नाहीत

संसर्गाची उत्तम संधी

विषाणूंना आमंत्रण

काय करतायत हे लोकं?

सर्व सुरु करणं चुकीची कल्पना होती

सध्या चीनमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी टप्प्याटप्प्यामध्ये सेवा सुरु करत गर्दी होणार नाही यासंदर्भात प्रशासनाने अधिक खबरदारी घेणं गरजेचे आहे. असं न झाल्यास नव्याने संसर्ग होण्याचा धोका नाकारता येणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus over 20000 people throng to tourist sites in china as covid 19 restrictions are lifted scsg
First published on: 09-04-2020 at 08:39 IST