इस्रायल हमास युद्धाचा भेसूर चेहरा जगासमोर आला आहे. रविवारीच एका इस्रायली नागरिकाने आपली बहीण कशी मारली गेली? त्याबाबत भाष्य केल्याची पोस्ट समोर आली. अशातच श्लोमी आणि शचर या दोघांची बातमी समोर आली आहे. या दोघांचीही हत्या करण्यात आली. शनिवारी झालेल्या हल्ल्यांपासून आजपर्यंत ११०० हून जास्त लोक मारले गेले आहेत. इस्रायलच्या ७०० हून अधिक तर गाझा येथील ४०० हून अधिक लोकांचा मृतांमध्ये समावेश आहे.

युद्धाचा भेसूर चेहरा आता समोर आला आहे. हमासमधले दहशतवादी हे वाहनांवर, घरांवर अंदाधुंद गोळीबार करत आहेत, अपहरण करत आहेत. इस्रायलमध्ये एकडान्स पार्टी सुरु होती तिथेही शेकडो लोकांची हत्या करण्यात आली. तसंच अनेक लोकांचं अपहरण करण्यात आलं.

हे पण वाचा- “सगळ्यांना ठार केलं आणि शेवटी मी….”, इस्रायली नागरिकाने बहिणीबाबत लिहिलेली पोस्ट वाचून डोळ्यात येतील अश्रू

अशातच एका दाम्पत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या दोघांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. त्यामुळे त्यांची मुलं पोरकी झाली आहेत. या दोघांचा फोटो X करत हे सांगण्यात आलं आहे हे दोघंही किती गोड होते आणि त्यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. आता त्यांची मुलं अनाथ झाली आहेत या आशयाचं एक X (पूर्वीचं ट्वीट) करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे फोटो शेअर करणं हे देखील कठीण आहे, पण काही पर्याय नाही असंही या X पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायल सरकारने सोशल मीडियावर हे देखील लिहिलं आहे की जे लोक पार्टीसाठी घराबाहेर पडले होते, क्षणार्धात ते रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह बनून पडले. हजारो निर्दोष नागरिक या सगळ्या संघर्षात मारले जात आहेत. तसंच आपले प्राण वाचवण्यासाठी धावत आहेत. पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांनी शेकडो इस्रायली नागरिकांचे प्राण घेतले आहेत, तसंच अनेकांचं अपहरण केलं. हमाससचे दहशतवादी हे कुटुंबं संपवत आहेत. आजोबा-आजींप्रमाणे असलेल्या वयोवृद्ध नागरिकांचंही अपहरण करत आहेत. तसंच ज्या लोकांना ठार केलं त्यांच्या मृतदेहांची विटंबनाही करताना दिसत आहेत.