२०११मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या व्यक्तीस दिल्ली उच्च न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. ज्या महिलेने आरोप केला होता ती व सदर व्यक्ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. महिलेने दिलेल्या जबानीत अनेक परस्परविरोधी विधाने करण्यात आली आहेत. कनिष्ठ न्यायालयाने २०१३ मध्ये दिलेला निकाल रद्दबातल करताना न्यायालयाने कलम ३७६ (बलात्कार) व कलम ५०६ (गुन्हेगारी धमकावणी) या आरोपांखाली सदर व्यक्तीस दोषी ठरवले होते. त्यासाठी या व्यक्तीला दहा वर्षे तुरुंगवास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. फिर्यादी महिला ही तिच्या पतीपासून लांब प्रतिवादीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती, असे न्या. प्रतिभा राणी यांनी सांगितले. सदर पुरुषाचे अपील ग्राहय़ धरताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे, की सदर महिलेने तिच्या साक्षीत वेळोवेळी बदल केलेले आहेत, त्यामुळे त्यात दमच नाही. सदर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. १३ व १४ जानेवारीच्या रात्री हा प्रकार झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Court acquits man of charges in rape case
First published on: 20-06-2016 at 00:02 IST