एकीकडे करोना संकटाचा सामना करण्यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले असताना दिल्ली सरकारने मद्याच्या होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी मद्याची ऑर्डर दिली जाऊ शकते. यामध्ये देशी आणि विदेशी मद्याचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली उत्पादन शुल्क (दुरुस्ती) नियम, 2021 मध्ये बदल करण्यात आल्यानंतर मोबाइल अ‍ॅप्स किंवा ऑनलाइन वेब पोर्टलचा वापर करून ऑनलाइन ऑर्डरद्वारे दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली जाईल.

दिल्लीचं मिशन अनलॉक; मुख्यमंत्री केजरीवालांचा मोठा निर्णय

याआधीच्या नियमानुसार, दिल्लीत फक्त एल-१३ परवाना असणाऱ्यांनाच डिलिव्हरीसाठी परवानगी होती. ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे ऑर्डर मिळाली असेल तरच निवासस्थानावर डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मोबाइलवरुन ऑर्डर घेण्यास मात्र मनाई होती.

मात्र आता नव्या नियमानुसार, मोबाइल अ‍ॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ दिल्लीतील सर्व मद्याच्या दुकानांना डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त एल-१४ परवाना असणाऱ्यांनाच ही परवानगी आहे.

लॉकडाउन जाहीर झाल्यानंततर दिल्लीत मद्याच्या दुकानांबाहेर भली मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं होतं. यामुळे करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत होती. सुप्रीम कोर्टाने यानंतर मद्याची होम डिलिव्हरी करण्यासंबंधी विचार करण्याचा सल्ला दिला होता. यावेळीही एप्रिल महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर दिल्लीत मद्याच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचं चित्र दिसलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 lockdown delhi home delivery of liquor mobile apps online portals sgy
First published on: 01-06-2021 at 10:58 IST