भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील बर्मिंगहॅम येथील सामन्यात एक अनोखा योगायोग जुळून आला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची भेट घेतली. बीसीसीआयने या दोन दिग्गजांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.

बर्मिंगहॅमच्या सामन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. आयसीसी आणि युनिसेफच्या Only4Children उपक्रमाअंतर्गत या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. एक दिवस लहान मुलांसाठी या टॅगलाईनखाली आयसीसीने निवडक लहान मुलांना दिग्गज क्रिकेटपटूंची भेट घडवून दिली. या सामन्यात भारताचा संघ भगव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला होता. सचिन तेंडुलकर या उपक्रमाचा ब्रँड अँबेसिडर आहे.