यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. रोहित शर्माने आठ सामन्यात चार शतकांसह ५४४ धावा केल्या आहेत. रोहित शर्माला सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर आहेत. सचिन तेंडूलकरने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत ६७३ धावा केल्या होत्या. आतापर्यंत एखाद्या विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिनच्या नावावर आहेत. तो विक्रम अद्याप अबाधित आहे. रोहित शर्माकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे.
सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला १२९ धावांची गरज आहे. साखळी फेरीतील भारताचा एक सामना अद्याप बाकी आहे. अखेरचा सामना भारताचा श्रीलंका संघाबरोबर आहे. तसेच उपांत्य फेरीतील एक सामना. असे दोन सामने अद्याप बाकी आहेत. भारत जर अंतिम सामन्यात पोहचला तर रोहितकडे सचिनचा विक्रम मोडण्यासाठी तीन सामने असतील. रोहित शर्माच्या सध्याचे प्रदर्शन पाहता हा विक्रम करने त्याला सहज शक्य आहे.
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा –
सचिन तेंडुलकर – ६७३ धावा (२००३)
मॅथ्यू हेडन – ६५९ धावा (२००७)
माहेला जयवर्धने – ५४८ धावा (२००७)
मार्टीन गप्टील – ५४७ धावा (२०१५)
कुमार संगकारा – ५४१ धावा (२०१५)
रिकी पाँटिंग – ५३९ धावा(२००७)
रोहित शर्मा – ५४४ धावा* (२०१९)
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. ९२ चेंडूच्या आपल्या खेळीमध्ये रोहितने ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. या खेळीमध्ये रोहितने मालिकेतील चौथे शतक ठोकले. एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये चार शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. तर एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच्या विक्रमाची बरोबर केली आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत चार शतके करण्याच विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावे आहे.