Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत असताना आज नागरिकांनी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाला चारही बाजूंनी घेराव घातला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याले कळताच राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी आपल्या घरातून पळ काढला. दरम्यान, या आंदोलनाला आता श्रीलंकन क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जयसूर्याने केली आहे.

“मी नेहमी श्रीलंकंन नागरिकांच्या पाठीशी उभा आहे. लवकरच आपला विजय होईल. कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता, हे आंदोलन सुरू ठेवावे”, असे ट्वीट सनथ जयसूर्याने केले आहे.

श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात ‘गोटा गो गामा’ आणि ‘गोटा गो होम’ आंदोलने अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र, हे आर्थिक आणि राजकीय संकट क्रिकेटपर्यंत पोहोचले आहे. आज आंदोलकांनी गॉल स्टेडियमला ​​घेराव घातला होता. याच स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया-श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हेही वाचा – SL vs AUS Test Series: आता तर स्मिथनेही ठोकले शतक; विराट कोहली मात्र अजूनही प्रतिक्षेतच