Crime News : माणिक अली या माणसासाठी आजचा दिवस हा आनंद देणारा ठरला. घटस्फोट झाल्याने मी आता स्वतंत्र झालो आहे. असं म्हणत माणिकने चक्क दुधाने अंघोळ केली. माणिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. माणिक अली हा आसामच्या नलबारी जिल्ह्यातला रहिवासी आहे. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर त्याने दुधाने अंघोळ करत आनंद साजरा केला.
व्हायरल व्हिडीओत काय दिसतं आहे?
माणिक अली नावाचा हा तरुण त्याच्या घराबाहेर उभा आहे. त्याच्या आजूबाजूला दुधाने भरलेल्या चार बादल्या आहेत. तसंच हातात प्लॅस्टिकचा मग आहे. तो भररस्त्यात दुधाने अंघोळ करतो आहे आणि आनंद साजरा करतो आहे. पत्नीला आज घटस्फोट दिला त्यामुळे मी खूप खुश आहे. आजपासून मी स्वतंत्र आहे असं माणिक अली नावाचा हा तरुण म्हणतो आहे. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर पतीने केलेल्या अंघोळीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसंच यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. माणिक अली हा ३२ वर्षांचा तरुण आहे. त्याची पत्नी त्याला दोनवेळा सोडून गेली होती. मात्र तो शांत बसला होता कारण त्याला कुटुंबाची काळजी होती. त्याच्या पत्नीचं एका माणसावर प्रेम होतं. त्यानंतर या दोघांचे खटके उडत होते. आता लोकांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
काय म्हटलं आहे माणिक अलीने?
माणिक अली म्हणतो माझी पत्नी तिच्या प्रियकरासह पळ काढत होती. मी माझ्या कुटुंबासाठी शांत राहिलो. मात्र तिला आता घटस्फोट दिला आहे. आता मी स्वतंत्र झालो आहे. त्याच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार माणिक अलीची पत्नी किमान दोनदा प्रियकरासह पळून गेली होती. गोष्टी विकोपाला जाण्यापेक्षा माणिक आणि त्याच्या पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आता माणिकने दुधाने अंघोळ केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
माणिक अली म्हणाला वकिलाने सांगितलं घटस्फोट झाला आहे, त्याचा आनंद मी साजरा केला
माणिक अली म्हणाला माझ्या वकिलाने मला सांगितलं की तुमचा घटस्फोट झाला आहे. त्यामुळे मी आज दुधाने अंघोळ करुन माझा आनंद साजरा करतो आहे. मी इतके दिवस शांत राहिलो कारण मला माझ्या कुटुंबाची चिंता होती. आता मात्र मी आनंदी आहे. त्यामुळे मी दुधाने अंघोळ करत माझ्या पद्धतीने आनंद साजरा करतो आहे असं माणिकने सांगितलं आहे.