Crime News : पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या महाविद्यालयीन मुलीवर घर मालकाने बलात्कार केल्याची घटना बंगळुरुमध्ये घडली आहे. ही मुलगी १० दिवसांपूर्वीच अश्रफ नावाच्या घर मालकाच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर अशरफ नावाच्या घर मालकाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात काय सांगितलं?

बंगळुरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महाविद्यालयीन मुलगी १० दिवसांपूर्वीच अश्रफच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहण्यासाठी आली होती. या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी रात्री अश्रफ तिच्या खोलीमध्ये आला. अश्रफ तिला म्हणाला तुला इथे राहायचं असेल आणि खायला प्यायला हवं असेल तर मला को ऑपरेट कर. ऐकायचं नसेल तर इथून निघून जा. या मुलीने अश्रफला नकार दिला. त्यावेळी अश्रफने तिचा हात पकडला तिला कारमध्ये घेऊन गेला. त्यानंतर तिला एका दुसऱ्या खोलीत नेलं. तिथे अश्रफने तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीचा जबाब काय?

या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी अश्रफ तिच्या रुममध्ये आला. मला को ऑपरेट कर. तरच राहू शकतेस नाहीतर इथून निघून जा. अशरफला माझ्याशी शरीरसंबंध ठेवायचे होते. मी त्याला नकार दिला तेव्हा त्याने माझा हात धरला. मला ओढत कारपर्यंत घेऊन गेला. बळजबरीने कारमध्ये बसवलं आणि त्यानंतर मला कारने एका खोलीपर्यंत घेऊन गेला. तिथे त्याने माझ्यावर बलात्कार केला. असा जबाब पीडितेने नोंदवला आहे. रात्री १.३० च्या दरम्यान मी माझ्या मैत्रिणींना माझं लोकेशन पाठवून मदत मागण्याचा प्रयत्नही केला. पण नेटवर्क गेलं होतं. साधारण २.१५ च्या सुमारास अशरफने मला पुन्हा माझ्या रुमवर आणून सोडलं असं या मुलीने सांगितलं.

महिन्याभरापूर्वी काय घडलं?

महिन्याभरापूर्वी अशीच एक घटना बंगळुरुमध्ये घडली होती. बंगळुरुमध्ये एका पेईंग गेस्ट मुलीवर तिच्या घर मालकाने बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणात रवी तेजा रेड्डी नावाच्या घर मालकाला अटक केली. २१ वर्षीय नर्सिंग स्टुंडटवर रवी तेजा रेड्डीने बलात्कार केला. २१ वर्षीय मुलीने त्याच घरात राहणाऱ्या एका मुलीचे सोन्याचे कानातले चोरले होते. तू जर काही बोललीस तर मी तिला हे सांगेन असं रवी तेजाने या मुलीला सांगितलं त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची तक्रार मुलीने केली होती. ज्यांतर रवी तेजाला अटक करण्यात आली होती.