महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलवलं आणि त्यानंतर तिने तिच्या पतीसह मिळून तिच्या प्रियकराची स्क्रू ड्रायव्हरचे वार करुन हत्या केली. उत्तर प्रदेशातल्या संभलमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या पती पत्नीला ताब्यात घेतलं. अनिश असं हत्या झालेल्या ४५ वर्षीय मध्यमवयीन पुरुषाचं नाव आहे. अनिशची हत्या त्याच्या या जोडप्याने केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनिशच्या कुटुंबाने सात लाख रुपयांच्या कर्जाच्या प्रकरणात अनिशची हत्या करण्यात आली असा आरोप केला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणात विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्याच कारणातून हत्या झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

अनिशच्या वडिलांचा आरोप काय?

अनिशचे वडील मुस्तकीम म्हणाले, “माझ्या मुलाला अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. माझ्या मुलाचे दोन्ही हात आणि पाय यांनी लाठ्या-काठ्यांनी तोडले. त्यानंतर त्याला निर्वस्त्र केलं आणि त्याची हत्या केली. या महिलेने अनिशला घरी बोलवलं होतं. त्याच ठिकाणी त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असा आरोप अनिशच्या वडिलांनी केला.सितारा नावाची एक महिला अनिशच्या घराशेजारीच राहते. या दोघांचे प्रेमसंबंध होते. अनिशने सात लाख रुपये सिताराच्या पतीला उधार दिले होते. तर सितारा आणि अनिशचे प्रेमसंबंध होते. अनिशने सिताराच्या पतीकडे सात लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर सिताराने त्याला घरी बोलवलं आणि मारहाण करुन त्याची हत्या केली. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत नेमकं काय सांगितलं?

अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार श्रीवास्तव म्हणाले अनिशची हत्या शनिवारी करण्यात आली. आम्ही या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास करत आहोत. या प्रकरणी आम्ही रईस अहमद आणि त्याची पत्नी सितारा अहमद या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी अत्यंत क्रूर पद्धतीने अनिशला ठार केलं याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अनिश आणि सितारा यांचे प्रेमसंबंध होते. सिताराने त्यानंतर अनिशची हत्या करण्याचा कट आखला. त्यानुसार त्याला घरी बोलवलं आणि त्यानंतर अनिशची हत्या केली. आता या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे.