CRPF jawan shot dead in Haryana days after brawl with village men during Kanwar Yatra : सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) जवानाची २८ जुलै रोजी त्याच्या हरियाणाच्या सोनीपत येथील घराच्या बाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या जवानाचा हरिद्वार येथे कावड यात्रेदरम्यान काही लोकाशी वाद झाला होता या वादानंतर ही हत्या झाल्याचे सांगितले जात होते. जवान कृष्ण कुमार यांच्या हत्येप्रकरणी आज तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जवान कृष्ण कुमार यांचे वय ३० वर्षे होते आणि ते सध्या सुट्टीवर आलेले होते असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी सकाळी घरी परतत असताना दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि पळून गेले होते.

“काही दिवसांपूर्वी कावड यात्रेदरम्यान गावातील काही तरुणांचा त्यांच्याबरोबर वाद झाला होता. त्यांची ओळख पटली आहे,” अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर लाल सिंग यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

हरिद्वारच्या यात्रेला जाण्यापूर्वीच कृशन यांना ठार करण्याचा कट रचण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कृष्ण यांच्याबरोबरच आरोपीने आनंद उर्फ पाहिया या दुसऱ्या एका व्यक्तीला मारण्याची योजना देखील आखली होती, असे पोलिसांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले. पोलिसांनी निशांत आणि अजय यांची हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळख पटवलू आहे.

कावड यात्रेसाठी जाण्यापूर्वी अजय याने त्याची परवाना नसलेली बंदुक मोहित या व्यक्तीकडे ठेवली होती. प्रवीन उर्फ मेंढक हा देखील या प्रकरणात अजय बरोबर सहभागी होता.

सागर नावाच्या व्यक्तीच्या कारचा वापर या हत्येमध्ये करण्यात आला. अजय आणि निशांत हे दोघे खेरी दमकन या गावात सागरच्या कारने गेले. अजय आणि निशात यांनी कृष्ण यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तेथून पळाले.

पोलिसांनी कार चालवणाऱ्या सागर याला तसेच प्रवीन उर्फ मेंढक आणि मोहित यांना अटक केली आहे. मुख्य आरोपी निशांत आणि अजय हे अद्याप फरार आहेत.

दरम्यान मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली जात आहे. तसेच अटक केलेल्या आरोपींनी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना एक दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्या झालेल्या जवानाच्या पाठीमागे पत्नी आणि एक मुल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली