Gujarat Crime: गुजरातच्या कच्छमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याची शुक्रवारी रात्री तिच्या लिव्ह-इन पार्टनर असलेल्या सीआरपीएफ जवानानेच हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गुजरातमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या सीआरपीएफ जवानाने महिला पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण देखील केलं आहे.

नेमकं घटना काय घडली?

अंजार पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून तैनात असलेल्या अरुणा जाधव या महिला अधिकाऱ्याचा सीआरपीएफ जवान दिलीप डांगचियाने गळा दाबून हत्या केली. तसेच हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जात आत्मसमर्पण केलं. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. या घटनेचा खुलासा झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी जवानाला अटक केलं असून पुढील तपास सुरू केला आहे.

आरोपी जवान हा गुजरात पोलीस दलात कार्यरत होता. आरोपी जवानाचे एएसआय असलेल्या महिला अधिकाऱ्याशी प्रेम संबंध होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांच्या दोघांमध्ये जोराचं भांडण झाल्याचं सांगितलं जात आहे. दोघांत झालेल्या वादानंतर आरोपी जवानाने एएसआय असलेल्या महिला अधिकाऱ्याचा गळा दाबून खून केला. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

दरम्यान, या घटनेबाबत अंजार विभागाचे पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) मुकेश चौधरी यांनी माहिती देताना सांगितलं की, “अरुणा आणि दिलीप २०२१ मध्ये इंस्टाग्रामद्वारे संपर्कात आले होते. ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. शुक्रवारी रात्री १० वाजता त्यांच्यात भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला. तसेच आरोपी जवान दिलीप डांगचियाने शनिवारी अंजार पोलीस ठाण्यात गेला, जिथे त्याने स्वतःला अधिकाऱ्यासमोर आत्मसमर्पण केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एएसआयच्या कुटुंबाला माहिती दिली. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मृत अरुणा जाधव ही कच्छ (पूर्व) पोलिसांच्या अंजार विभागातील अंजार पोलीस ठाण्यात एएसआय म्हणून कार्यरत होती. दरम्यान, ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा रात्री उशिरा अरुणा आणि तिचा मित्र दिलीप डांगचिया यांच्यात कशावरून तरी जोरदार भांडण झालं होतं. त्यानंतर त्याने तिची घरी गळा दाबून तिची हत्या केली.