चौधरी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी निवड झाल्याने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा आदर संपुष्टात आल्याचे सांगत सरकारविरोधात संघर्ष करण्याचा इशारा जेठमलानी यांनी दिला आहे. भाजपमधून निलंबित केलेल्या जेठमलानींनी पंतप्रधानपदासाठी मोदींना जोरदार पाठिंबा दिला होता. मात्र आता चौधरी यांच्या नियुक्तीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले. तसेच तुमच्याबद्दलचा आदर आज संपला अशा शब्दात जेठमलानींनी मोदींना पत्र पाठवले आहे. मोदींसमवेत आपली युती संपली असे ट्विट जेठमलानींनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cvc cic appointments irk jethmalani says respect for modi ends today
First published on: 09-06-2015 at 02:12 IST